27 April 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कठोर निर्णयासाठी मी तुमची माफी मागतो - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi, Mann Ki Baat, Lock Down, Corona Crisis

नवी दिल्ली, २९ मार्च : कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊनंतर जनतेला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये जनतेची माफी मागितली आहे. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. लॉकडाऊन करणं गरजेचं होतं अन्य़था कोरोना संसर्ग वेगानं पसरला असता असं ते म्हणाले.

जगाची सध्याची ही परिस्थीती पाहता हे निर्णय घेणं भाग आहे. यामुळे देशवासीयांना काही दिवस कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, मात्र मी पुन्हा एकदा त्यासाठी मनापासून माफी मागतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

लॉकडाऊनच्या घोषणनेनंतर दिल्ली महाराष्ट्रमधून हजारो मजूर पायपीट करत आपल्या गावी निघाले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामच मिळत नसल्यानं पोट कसं भरणार? असा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणी दूधाच्या टँकरमध्ये लपूनछपून तर कोणी पायपीट करत प्रवास करत आहे. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलावी लागतात. आज काही देशांची वाइट परिस्थिती आहे ही परिस्थिती इथे येऊ नये म्हणूनच काही निर्णय घेतले आहेत, असं ते म्हणाले.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi today interacted with the public through ‘Mann Ki Baat’. For the first time since the announcement of the lock down, Modi made this dialogue in the wake of the Corona virus. Before launching this dialogue, Modi has apologized to the countrymen. ‘Due to some decisions the poor people are facing difficult times, so I apologize to them, I know your problem, but there is no other way to fight Corona. This life is a war of death. Therefore, tough decisions have to be taken for the country, the countrymen, ”he said.

 

News English Title: Story Prime Minister Narendra Modi address the Nation through his radio program Mann Ki Baat over Corona Crisis Lock Down News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x