29 March 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

बलात्कार पीडितेला योगी न्याय देतील कंगनाला विश्वास | अर्नबकडून LIVE डिबेट नाही

Uttar Pradesh, Hathras Gangrape, Arnab Goswami, Kangana Ranaut

लखनौ, ३० सप्टेंबर : माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

देशात एवढी मोठी घटना घडलेली असताना अर्णब गोस्वामीला भारताला कोणताही प्रश्न विचारावा असं वाटत नसून त्यासाठी त्याने कोणतंही डिबेट भरवून उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला धारेवर धरलं नाही. तर दुसरीकडे ट्विटरवर वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकेरी उल्लेखूनआणि महापालिकेला थेट मेन्शन करताना गरळ ओकणाऱ्या कंगनाने याच घटनेवर ट्विट करताना मुख्यमंत्री आदित्यनाथ पीडितेला न्याय देतील असा विश्वास आहे असं ट्विट मध्ये म्हटलं आहे.

 

News English Summary: A 20-year-old woman, who died on Tuesday in Delhi two weeks after she was gang-raped and tortured in Uttar Pradesh’s Hathras, was cremated by policemen last night, allegedly as her family and relatives were locked up in their homes. A disturbing sequence of events captured in overnight visuals shows the family arguing with cops, female relatives throwing themselves on the hood of the ambulance carrying the body and a mother weeping helplessly as cops insist on taking her daughter straight to cremation, without allowing a last look.

News English Title: After Uttar Pradesh Hathras Gangrape neither Arnab Goswami took any debate nor Kangana Ranaut asked any question to CM Yogi Adityanath Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x