5 August 2021 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
x

Health First | फ्रिजमध्ये कणिक ठेवता? | चुकूनही वापरू नका फ्रिजमधील कणीक, कारण वाचा

Kanik in Fridge

मुंबई, ११ जून | आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळी लवकर ऑफिसला जाता यावं किंवा सकाळी उशीर होऊ नये म्हणून रात्रीच सकाळची बरीच तयारी करून ठेवली जाते. त्यात कणिकही रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवली जाते. जेणेकरून वेळ वाचावा. पण मळून फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे तुम्हाला अनेक आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भलेही तुम्ही कणिच चांगली राहण्यासाठी ठेवता पण फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने या कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एकवेळ तुम्ही शिळ्या पोळ्या खाल्ल्या तरी चालेल पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करू नका:
पोळी हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. पण कधी कधी गृहिणी वेळ वाचवण्यासाठी दिवसातून एकदाच पोळ्यांसाठी लागणारी कणीक मळून ठेवतात आणि फ्रिजमध्ये ठेवून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हे तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तुमचीही सवय सगळ्यांच्याच आरोग्यासाठी हानीकारक आहे.

1. चला जाणून घेऊया फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक तुमच्या आरोग्याला कशाप्रकारे अपायकारक ठरू शकते.

2. आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे की, एकदा मळलेली कणीक दुसऱ्यांदा वापरणं तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे.

3. एकवेळ तुम्ही शिळ्या पोळ्या खाल्ल्या तरी चालेल पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करून नये. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकतं.

4. आरोग्य विशेषज्ञांच्यामते नेहमी ताज्या कणकेच्या पोळ्या करून खाव्यात. कारण मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवल्यावर फ्रिजमधील हानीकारक किरणांमुळे त्यातील पोषक तत्त्व पूर्णतः नष्ट होतात. तसंच या कणकेने बनवलेल्या पोळ्या चांगल्याही लागत नाहीत आणि आरोग्यदायीही नसतात.

5. शास्त्रांनुसार, शिळ्या कणकेपासून बनवलेल्या पोळ्यांना ‘भूत भोजन’ असं म्हटलं जातं. असं म्हणतात की, हे जेवण जेवणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य नेहमी रोग आणि समस्यांनी घेरलेलं असतं. तसंच शिळ्या कणकेच्या पोळ्यांचा समावेश जेवणात असल्यास लोक आळशी किंवा रागीट होतात.

6. वरील सर्व कारणांसोबतच शिळ्या कणीकेच्या पोळ्या खाल्ल्यामुळे गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठ यासारख्या आजारांनी तुमचं शरीर ग्रस्त होईल. त्यामुळे तुमच्या आणि घरातील सदस्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आजपासूनच फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करणं बंद करा.

7. लक्षात कोणताही पदार्थ ताजा आणि बनवल्या बनवल्या खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्व तुम्हाला फायदेशीर ठरतात. पण फ्रिजमध्ये ठेवून किंवा शिळं खाल्ल्यास त्यातील आरोग्यदायी घटकांचा नाश होतो. त्यामुळे ते शरीराला अपायकारक ठरतात. म्हणूनच जेवण आणि इतर खाद्यपदार्थ ताजे असतानाच त्यांचा आस्वाद घ्यावा.

हॅशटॅग्स

#Health(660)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x