15 December 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Old Saree New Look | कपाटातील जुन्या साड्यांना द्या नव्या साडीचा लुक, त्यासाठी अधिक जाणून घ्या हा महागाईतील ट्रेंड

Saree New Design For Ladies

Saree For Ladies | प्रत्येक महिलेला साडी नेसण्याचा शौक असतो, तर साडी ही महिलांची कमजोरी असते, कोणत्याही वेशभुषेतील साडी असो ती महिलांना उठूनच दिसते. साडी ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे, वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये साडी नेसली जाते. साडी नेसायला सर्व महिलांना आवडते, मात्र ती पारंपारिक पद्धतीने कशी नेसायची हे माहिती नसते. पूर्वी या साडीकडे एथनिक वेअर म्हणून पाहिले जात होते. पण आता साडी वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये नेसली जात आहे. आम्ही तुम्हाला साडीचे काही खास प्रकार सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही या लुकमध्येही खूप स्टायलिश दिसू शकता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की.

प्रत्येकाला वेळेनुसार चालावे लागते. त्यामुळे आपल्या वॉर्डरोबमध्ये असे अनेक कपडे/साड्या असतात ज्या आपण आधी नेसत होतो मात्र त्यांचा आता जमाना नाही. काही गोष्टींशी आपल्या भावना जुळलेल्या असतात त्यामुळे आपण त्याकधी आपल्यापासून लांब देखील करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वॉर्डरोबमधील तुमच्या जुन्या साड्यांना नवीन करा. तुम्ही साड्यांवर गोटा पट्टीचे काम करू शकता. गोटा पट्टी म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. गोटा पट्टी वर्क राजस्थानी साड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग आम्ही तुम्हाला गोटा पट्टीचे काम करून जुनी साडी कशी नवीन बनवू शकता ते सांगते.

शिफॉन लेहरिया साडीवर करा गोटा पट्टी वर्क :
तुमच्या जुन्या साड्यांमध्ये तुमच्याकडे शिफॉन लेहरिया साडी किंवा कोणतीही शिफॉनची साधी साडी असेल तर त्याला तुम्ही लेहरिया स्टाईलमध्ये गोटा पट्टी वर्क करून घेऊ शकता. समजा धुतल्यानंतर साडीची लेस निघत असेल तर तुम्ही गोटा पट्टी वर्क शिवू शकता. बाजारामध्ये तुम्हाला गोल्डन, सिल्व्हर आणि कॉपर अश्या तीन रंगामध्ये गोटा पट्टी वर्क मिळून जाईल.

जॉर्जेट किंवा सिल्क :
महिलांच्या वॉर्डरोबमध्ये साड्यांचे कलेक्शन पाहण्यासारखे असते. त्यातली त्यात तुमच्या कडे शिफॉन, जॉर्जेट, सिल्क किंवा कॉटनची जुनी साडी असल्यास त्यावर तुम्ही गोटा पट्टीचे काम करू शकता. गोटा पातीची गाठी किंवा फ्लॉवर साडीवर बनवणे हे देखील खूप सोपे काम आहे. साडीवर वर्क करण्यासाठी तुम्हाला रुंद आकाराचे गोळे लागतील. साड्यांना गोटोमध्ये कटवर्क करून तुम्ही त्यांचा वापर करू शकता. बाजारामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कटवर्क मिळून जातील. मात्र आपण फक्त कठोर फॅब्रिकचे तुकडे घ्यावेत.

दरम्यान, तुमच्या कडे हा सोपा मार्ग आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या जुन्या साड्या नवीन करू शकता. जुन्या साड्यांना गोटा किंवा बॉर्डरचे काम करणे अगदी सोपे असते. तसेच तुम्हाला बाजारामध्ये रेडीयम मिळेल, या रेडीयमचा वापर करून तुम्ही साड्यांना नवी डिझाईन देऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Old Saree with look for latest fashion for ladies checks details 04 April 2023.

हॅशटॅग्स

Saree New Design For Ladies(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x