6 May 2021 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी
x

दिल्ली | ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू, ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात

India corona pandemic

नवी दिल्ली, २३ एप्रिल: देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

देशात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, बी. १.६१७ नावाच्या या नव्या विषाणूत असामान्य म्युटेशन ई ४८४ क्यू व एल ४२५ आर आहे. त्याला डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हटले जात आहे. तो वेगाने बाधित करू लागला आहे. परंतु कोरोनाविरोधात मिळालेल्या वेळेचा भारताने अपव्यय केला. म्हणूनच कोरोनाने महाप्रलयाचे रूप धारण केले, असे संशोधकांना वाटते. देशात सध्या सर्वत्र ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवतेय.

दरम्यान, दिल्लीमधील गंगाराम इस्पितळात उपचार सुरु असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

गंगाराम इस्पितळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “मागील २४ तासांत २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. व्हेटिंलेटरदेखील नीट काम करत नाही आहेत. आयसीयू आणि एमजर्नसीमध्ये सध्या मॅन्यूअल व्हेटिंलेशन सुरु आहे. मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. ६० रुग्णांचा जीव सध्या सध्या धोक्यात असून तात्काळ मदतीची गरज आहे”. रुग्णालयाने तात्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: Twenty-five critically ill patients undergoing treatment at Delhi’s Gangaram Hospital have died in the last 24 hours. This information has been given by the hospital itself. According to the information provided by the hospital at 8 am, there is only enough oxygen left for two hours at present and the lives of more than 60 patients on oxygen are in danger. According to NDTV, citing sources, the patients are likely to die due to low oxygen pressure.

News English Title: 25 corona patients dead due to low pressure of oxygen in Delhi Gangaram Hospital news updates.

हॅशटॅग्स

#Delhi(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x