23 June 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवसंस्थेचे मुद्दे सोडून फक्त अदानी ग्रुपचा मुद्दा संसदेत तापू नये म्हणून भाजपकडून राहुल गांधींची बदनामी?

BJP President Nadda

Rahul Gandhi | संसदेत सुरू असलेला गदारोळ थांबण्याची शक्यता नाही. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना बोलू दिले जाणार नाही, असे भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. पण इथं राहुल गांधी सतत आपल्यावरील आरोपांबाबत बोलत असतात, पण भाजपला आधी माफी हवी आहे आणि ती सुद्धा न केलेल्या चुकीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही काँग्रेसकडून सातत्याने ‘सभागृहाच्या ढिसाळ कारभारा’वरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना सभागृहात बोलू दिले जाणार नाही. लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावर पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ देखील सार्वजनिक असून त्यात राहुल गांधी काहीही चुकीचं बोलले नसून उलट त्यांनी त्या प्रश्नावर हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असून तो सोडवायला आम्ही सक्षम आहोत असं उत्तर दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र भाजप सध्या अदानी मुद्दा संसदेत राहुल गांधी उचलून धरू नये म्हणून वेगळीच राजकीय नीती अवलंबत असल्याचं बोललं जातंय.

अदानी मुद्दा संसदेत तापण्याची भाजपाला भीती
भाजपबरोबरच सभागृहातही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच आहे. उद्योगपती गौतम अदानी आणि अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च यांच्या अहवालाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, ‘आधी माईक बंद असायचा, आज सभागृहाचे कामकाज शांत झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या मित्रासाठी सभागृह शांत आहे.

भाजप नेत्यांकडून मूळ विषयांना बगल
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, संसदेपेक्षा एका कुटुंबाचा अहंकार मोठा आहे, हे दु:खद आहे. राहुल यांनी परकीय भूमीवर परकीय हस्तक्षेप करून आमच्या सार्वभौमत्वाविरोधात आक्षेपार्ह विधाने केली आहेत. जर ते संसदेबाबत गंभीर असतील तर त्यांनी ताबडतोब माफी मागावी. आपण संसद ेला कमकुवत करू शकत नाही आणि नंतर त्याचा आधार घेऊ शकत नाही. आधी देशाची माफी मागावी.

याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल यांच्यावर संसदेचा अपमान केल्याचा आरोप केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीही काँग्रेस खासदाराला देशविरोधी टूलकिटचा भाग म्हटले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, खासदार निशिकांत दुबे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी राहुल यांना परदेशात केलेल्या वक्तव्यांमुळे घेरले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP President Nadda said Rahul Gandhi is included in anti national tool kit no one in the country check details on 17 March 2023.

हॅशटॅग्स

#BJP President Nadda(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x