3 May 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मुंबई कांदिवलीत सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी पकडली

Corona Crisis, Covid 19, Sanitizer seized

मुंबई, ३० मार्च: राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून आज आणखी १५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पुण्यातील तब्बल पाच जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे.

राज्यात आज वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील पाच, मुंबईतील तीन, नागपूरमधील दोन तसंच, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्या व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. या सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सध्या करोना विषाणूपासून बाचावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हँड सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढली आहे. अशा काळात लाखो रुपयांच्या सॅनिटायझरच्या बाटल्यांचा साठा मुंबई पोलिसांनी पकडला आहे. चारकोप पोलिसांनी रविवारी ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या छाप्यात पोलिसांनी ZUCI कंपनीच्या १०० मिलीच्या २३०० बाटल्या, ५०० मिलीच्या ७५०० बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्यांची एकूण किंमत १०, २८, ५०० रुपये इतकी आहे. सरकारने १३ मार्च २०२० रोजी काढलेल्या नोटिफिकेशनुसार सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश होतो. त्यामुळे याचा साठा करणाऱ्या आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: At present, the demand for hand sanitize has increased tremendously across the country in the wake of the Corona virus. Mumbai police have seized millions of rupees worth of sanitize bottles. Charkop police have taken the stabbing action on Sunday. Two people have been taken into custody. In this raid, the police have seized 2300 bottles of 100 ml of ZUCI company, 7500 bottles of 500 ml. The total cost of these bottles is Rs 10, 28, 500. According to a notification issued by the government on March 13, 2020, sanitize is included in essential commodities. The accused, therefore, has been charged under the Essential Goods Act.

 

News English Title: Story big stock of Sanitizer seized by Mumbai police two people arrested News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x