13 December 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

अनेकपण गरिबांना वेळेत मदत करण्यात व्यस्त; भाजपचं मात्र 'मोदी-किट' मार्केटिंग

Corona Crisis, Corona Virus, Modi Kit

नवी दिल्ली, २७ मार्च: मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन केल्यानंतर इतके दिवस कुटुंबाने जगायचे कसे या प्रश्नाने रोजंदारीवर कामं करून पोट भरणाऱ्या लोकांचं आयुष्यच टांगणीला लागलं आहे. कामाच्या निमित्ताने जेथे हे मजूर कामगार वास्तव्यास होते तेथे कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि २१ दिवस असेच शांत बसून राहिलो तर कोरोना आधीच आयुष्य असंच संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे २१ दिवस न थांबता हे मजूर त्यांच्या गावी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात थेट पायी चालत जाताना दिसत आहेत. संपूर्ण देशातील हायवेवर हेच चित्र पाहायला मिळत आहे.

रस्त्यातही खाण्या – पिण्याचा प्रश्न आहेच… पण या प्रश्नाची थोड्या का होईना पण स्थानिक लोकांनाही जाण आहे. त्यामुळे त्यांनी काही खाण्या-पिण्याची पाकिटं, बिस्कीटं या पायी चालणाऱ्या लोकांना पुरवली. रस्त्यावरून चालताना एखादी गाडी मिळाली तर ही आशाही त्यांना लागून होती… परंतु, लॉकडाऊनच्या काळात त्यांची ही आशाही फोल ठरली. राजधानी दिल्ली, गुजरात आणि अशाच मोठ्या शहरांकडून आपल्या गावांकडे निघालेल्यांची संख्या मोठी आहे.

देशभरातून विविध स्वयंसेवी संस्था, सामान्य लोकं आणि अगदी पोलीस कर्मचारी देखील शक्य होईल तितकी मदत गरजूंकडे वेळेत कशी पोहोचेल याची काळजी घेताना दिसत आहेत. मात्र मार्केटिंगचा पिंड असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी या आपत्तीत देखील गरजूंना मदत करताना वेळे पेक्षा मोदींचं मार्केटिंग कसं करता येईल यावर आणि या समाजसेवेच्या कामाला ‘थीम नेम’ अधिक मार्केटिंग कसं करता येईल यावर वेळ खर्ची पडल्याचं पाहायला मिळत आहे. काही वस्तूंचं वाटप करताना त्या सामानाच्या किटला ‘मोदी-किट” असं नामकरण करून आपत्तीला देखील संधीत रूपांतरित केलं आहे.

 

News English Summary: After Modi’s 21-day lock down, the question of how a family can live for so long has begun to fill the lives of those who work for their wages. They say there is no hunger strike due to lack of work where these laborers lived for work and if they stay quiet for 21 days, they say that Corona will end their life already. So, without having to wait 21 days, these laborers appear to be walking straight from one state to another. This is the picture seen on highways across the country. Various NGOs, ordinary people and even police personnel from all over the country are taking care of how to reach the needy in as much time as possible. However, BJP leaders, who are in the marketing arena, are also seen spending time on how Modi can be marketed more than time while helping the needy and doing more marketing by giving the theme of this social service work. Disaster has also been converted into an opportunity by naming it a ‘Modi-kit’ while distributing certain goods.

 

News English Title: Story during Corona Crisis BJP is ready for Modi Kit Marketing News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x