15 December 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच काँग्रेसकडे आले होते, अशोक चव्हाण यांनी शिंदेंची राजकीय हवाच काढली

Ashok Chavan

Ashok Chavan | महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होत आहे. शिवसेनेला निधी मिळत नाही, असा आरोप करीत शिंदे गटाने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्याता आहे.

शिंदे शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते :
अशोक चव्हाण म्हणाले, भाजप, शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोटच अशोक चव्हाण केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला.

भाजपसोबत आता राहायचे नाही अशी भूमिका :
भाजपसोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वीच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. तेव्हा शिवसेनेचे मंत्री आमचा राजीनामा खिशात आहे, असे जाहीर भाषणांमध्येही सांगत होते. युतीसरकामध्ये आपल्याला सन्मान मिळत नाही, अशी तक्रारही शिवसेनेने केली होती. आपण, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते आले होते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण यांनी सांगितले आहे, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले आहे.

शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला :
अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते, असेही चव्हाण यांनी सांगितले. मात्र, नंतर ते पवार साहेबांना भेटले किंवा नाही याबाबत मला काहीही माहिती नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former CM Ashok Chavan statement on Eknath Shinde check details 29 September 2022.

हॅशटॅग्स

#Ashok Chavan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x