28 April 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

कोरोनासंदर्भात पोलिसांकडून देशभर हटके जनजागृती मोहीम

Corona Crisis, Covid 19, Police Dept

मुंबई, ३० मार्च: करोना व्हायरसचा देशभरात दिवसेंदिवस वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे. जगभरात करोना व्हायरस या आजारामुळे थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने देशात लॉक डाऊन जाहीर केले आहे शिवाय अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जात आहे. या साठी जागोजागी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.

दरम्यान, अनेक शहरातील पोलीस कोरोनासंदर्भातील जनजागृतीसाठी निरनिराळया मोहीम राबवत असल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यात पोलिसांनी गाण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. एएनआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे येथील धनकवडी पोलिसांच्या टीमने ‘लगान’ चित्रपटातील ‘अपनी जीत हो उनकी हार हो..’ या गाण्याच्या सूरात कोरोनाविषयी गाणे गात घरातून बाहेर पडू नका, असा संदेश दिला.

दक्षिणेकडील राज्यात तर रस्त्यावरील पहारा देणारे पोलीस डोक्यावर कोरोनारूपी टोपी घालून सामान्य लोकांना जनजागृती करून दक्ष राहण्याचे सल्ले देताना दिसले. त्यामुळे एकूण देशभरात पोलिसांनी राबविलेल्या जनजागृतीमुळे कोरोनाविरुद्धच्या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली आहे.

 

News English Summary: Meanwhile, police in many cities have been seen conducting various campaigns for awareness raising in the coronas. In Pune, police found that the song was trying to raise awareness among the citizens about the corona virus. ANI has shared a video about it. The team of Dhankawadi police in Pune gave the message that they should not leave the house in the movie ‘Lagan’. In the southern states, policemen guarding the streets were seen wearing a coronet-like hat on the head and giving general public awareness and warning. Therefore, the awareness raised by the police throughout the country has played an important role in the campaign against Corona.

 

News English Title: Story Police campaigns all over India regarding Corona Crisis Covid 19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x