1 February 2023 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Union Budget 2023 Income Tax | इन्कम टॅक्स सूटचा कोणाला किती लाभ मिळणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा
x

कोरोना आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार: शरद पवार

Sharad Pawar, Corona Virus Crisis

मुंबई, २७ मार्च: देश आणि राज्यावर आलेलं करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे. केवळ माणसांवरच नाहीतर पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे, असं सांगतानाच करोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार असून प्रत्येकाचं आर्थिक गणितही बिघडणार आहे. या संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

‘आजचं संकट गंभीर…दीर्घकालीन परिणाम करणारं आहे. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं हे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. मी कुणालाही भेटलेलोही नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध संस्थांवर मोठी जबाबदारी आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी, असंघटीत कामगार, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याबाबत काही मागण्या केल्या आहेत.

ते म्हणाले, कोरोना विषाणूचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम दीर्घकालीन असणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काही घोषणा केल्या आहेत. पण दिलेले पॅकेज शेती आणि शेतकरी यांच्यासाठी पूरक नाही. पीककर्जाची परतफेड करणे सोपे जाणार नाही. सध्या शेतात गहू तयार झाला आहे. पण तो काढायचा कसा, हा प्रश्न आहे. आंबा, संत्रे बागा फळांनी भरलेल्या आहेत. पण त्याची तोड कशी करायची, हा प्रश्न आहे. ही शेती उत्पादने बाजारात कशी आणायची हा सुद्धा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर या सगळ्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यासाठी सरकारने काही आणखी निर्णय घेतले पाहिजेत. कर्जाच्या हफ्ते वसुलीमध्ये एकवर्षाची सूट दिली पाहिजे. जे शेतकरी कर्ज चुकवू शकणार नाहीत, त्यांना थकबाकीदार ठरवू नये, अशी मागणी त्यांनी केली.

 

News English Summary: Sharad Pawar said the corona virus’s impact on the economy was going to be long-term. The government has made some announcements against this. But the package provided is not a supplement to the farmer and the farmer. Repaying a loan is not going to be easy. At present, wheat is produced in the fields. But how to remove it, is a question. Mangoes, oranges are full of orchards. But how to break it is a question. There is also the question of how to market these agricultural products. All of this will be adversely affected on the economy of the farmers. For this, the government must take some more decisions. One-year rebate should be given in the week of loan recovery. He demanded that the farmers who could not repay their loans be made outstanding.

 

News English Title: Story NCP President Sharad Pawar live press conference on Corona Virus Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x