12 December 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात पंकजा मुंडेंचे समर्थक भिडणार | प्रवीण घुगेंची बंडखोरी

Praveen Ghuge, BJP candidate, Aurangabad graduate constituency

औरंगाबाद, १२ नोव्हेंबर: राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.

तर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी देखील बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची देखील बंडखोरांमुळे डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच राष्ट्रवादीच्या अडचणीत देखील भर पडली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचेच कट्टर समर्थक असलेल्या शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, आता मुंडे समर्थकांनी केलेल्या डबल बंडखोरीचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

News English Summary: Praveen Ghuge, a staunch supporter of BJP leader and former Rural Development Minister Pankaja Munde, filed his candidature in the Aurangabad graduate constituency in revolt against the BJP. So, former district president of Beed Ramesh Pokale has also filed an application waving the flag of rebellion. Therefore, while the Bharatiya Janata Party’s headaches have been exacerbated by the insurgency, it has also added to the NCP’s woes.

News English Title: Praveen Ghuge revolt against the BJP candidate in Aurangabad graduate constituency election news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x