15 December 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

घटना गैरसमजुतीतून घडली; आपत्तीच्या काळात राजकारण करणे चुकीचे

Covid 19, Corona crisis, Palghar Mob Lynching

मुंबई, २१ एप्रिल: आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे याठिकाणी करोन नियम करा, असा सल्ला राज्यसरकारला राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी पालघरचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.ते फेसबुक लाईव्हद्वारे बोलत होते. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. पालघरचे राजकारण घडायला नको हवे होते, असेही ते म्हणालेत.

‘पालघरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या नावलौकीकाला निश्चितच साजेसं नाही. जे घडले ते घडायला नको होते. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.’, असे पवारांनी सांगितले. तसंच, ही घटना गैरसमजुतीतून झालेली आहे. त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. याप्रकरणी काही तासांत राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घेतली. दुसऱ्या दिवशीच पोलिसांनी १०० जणांना अटक केली. याप्रकरणाचा तपास सुरु आहे, असे पवारांनी सांगितले.

यावेळी शरद पवारांनी करोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे असं आवाहन केलं आहे. “तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाउनचा कालावधी नाईलाजानं तीन आठवड्यांसाठी वाढवावा लागला. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली तर ३ मे नंतर परिस्थितीत बदल होईल. नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यादरम्यान त्यांनी काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका असं म्हणत मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असंही स्पष्ट केलं.

 

News English Summary: It is wrong to do politics in Palghar, said Pawar. He was speaking through Facebook Live. If anything happens to Palghar, Chief Minister Uddhav Thackeray has ordered his inquiry. Some people have been arrested in the case. Palghar case and Karona have nothing to do.

News English Title: Story NCP President Sharad Pawar reaction on Palghar Mob lynching case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x