15 December 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ व शिवसेनेविरुद्ध ठेवीदारांची मोहीम

Shivsena, Amaravati, Anandrao Adasul, The City Co Operative Bank

मुंबई : लोकसभा निवडणुका झाल्या असताना शिवसेनेचे अमरावतीचे खासदार अडचणीत आल्याचे चित्र आहे. कारण ‘द सिटी को ऑप. बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या विरुद्ध समाज समाज माध्यमांवर मोहीम सुरु केली आहे. त्यात संबंधित ठेवीदार हातात बॅनर घेऊन त्यावर एक संदेश देत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

सिटी को ऑप. बँकेच्या ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयच्या या निर्बंधामुळे सिटी को ऑप. बँकेचे ग्राहक मुंबईस्थित गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून रोज गोंधळ घालत बँकेच्या प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करत असतात.

आरबीआयने १७ एप्रिल रोजी सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाला प्रत्यक्ष पत्र पाठवून कोणत्याही ठेवी घेण्यास आणि कर्ज देण्यास मनाई केली होती. त्याबरोबरच आरबीआयने केलेल्या पत्रव्यवहारा प्रमाणे सिटी को ऑप. बँकेला कोणत्याही व्यवहारासाठी आधी रिझर्व बँकेची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे असं स्पष्टं केलं आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांसमोर एकच खळबळ उडाली होती.

सिटी को ऑप. बँकेच्या एकूण दहा शाखा असून रिझर्व्ह बँकेकडून आधी म्हणजे डिसेंबरमध्ये एक नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतरच १७ एप्रिलला आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व बचत आणि सेव्हिंग, चालू आणि करंट अकाऊंट आरबीआयने सील करून सिटी को ऑप. बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आणि हि बातमी पसरताच बँकेच्या ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली होती. ग्राहकांनी जेंव्हा आम्हाला आमचे पैसे परत हवे, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाने स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हे शक्य नसल्याचं आम्ही त्या बाबतीत काहीच करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ हे सिटी को ऑप. बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आरबीआयच्या या निर्बंधांबाबत प्रतिक्रिया दिली होती की, आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह निर्बंध येण्यापूर्वी आम्ही सिटी को ऑप. बँकेचे दुसऱ्या बँकेत विलिनीकरणाचे प्रयत्न सुरु केले होते आणि काम पूर्ण झालं असून, काही दिवसात हे विलिनीकरण पूर्ण होईल, त्यामुळे बँकेच्या ग्राहकाने चिंता करु नये. तसेच कोणाचाही पैसा बुडणार नाही. प्रत्येकाचे पैसे या बँकेत सुरक्षित असून, बँकेवर ७५ वर्ष जसा विश्वास ठेवला तसाच कायम असू द्या” असं आवाहन खासदार अडसूळ यांनी केलं. परंतु ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत, त्यामुळे ग्राहक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

केवळ रिजर्व्ह बँकेच्या परवानगीनेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि लग्न समारंभ यासाठी लागणारी ५०,००० एवढी रक्कम बँकेकडून मिळणार आहेत त्यामुळे ग्राहकाची डोकेदुखी वाढली आहे. महाव्यवस्थापक आणि जनरल मॅनेजर रमेश शिरगावकर यांनी काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बेमालूमपणे २०१४-१५ आणि २०१५-१६ व्यवहार केले जे आम्हाला उशिरा कळल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, याच संतप्त ग्राहकांनी आता आनंदराव अडसूळ आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरु केल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ माजली आहे. त्यात बॅनरवर संदेश लिहीत ठेवीदार म्हणतात की, ‘सूचना…द सिटी को ऑपरेटिव्ह बँक….बँकेचे ग्राहक राहतात ज्यांचे पैसे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुळे बुडाले आहेत आणि त्यात एकही शिवसेना पदाधिकारी आमच्या मदतीस आलेला नाही म्हणून कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्याने येथे मत मागायला येऊ नये” असा सज्जड दम दिला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x