13 August 2022 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भारतीय शास्त्रज्ञांची अंतराळ क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी

DRDO, India, Satellite

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून आज सकाळी ११:४५ ते १२:०० वाजताच्या दरम्यान मी जनतेशी संवाद साधून एक संदेश देणार असल्याचे म्हटले. जवळपास सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी जनतेला संबोधित केले. भारताने आज अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात मोठी झेप घेतली, असे म्हणत त्यांनी शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा केली. अमेरिका, चीन, रशियानंतर हे पाऊल उचलण्यात भारताचा जगात चौथा क्रमांक ठरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची घटना समजली जात आहे. विशेष म्हणजे ही मोहीम यशस्वी करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं मोदींनी सांगितलं. देशाला शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याचं ते म्हणाले.

भारताने केवळ ३ मिनिटांत उपग्रह पाडलं. भारताने ही असाधारण कामगिरी पार पडल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. स्पेस पॉवर म्हणून भारताचा जगामध्ये उदय झाल्याचे त्यांनी सांगितले. आमची ही नवी क्षमता कोणत्याही देशाविरुद्ध नसून आम्ही शांतता प्रिय देश आहोत असं म्हणायलाही यावेळी पंतप्रधान विसरले नाहीत.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x