18 May 2021 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

भारत इंग्लंड पाचवी टेस्ट: पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८

इंग्लंड : भारत इंग्लंड मधील पाचव्या टेस्टमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडला ७ बाद १९८ अशा कात्रीत पकडले आहे. पहिल्या दोन सत्रात इंग्लंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली होती. परंतु, चहापानानंतर मात्र भारताने तब्बल ६ बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले असून भारत सुस्थितीत गेला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इंग्लंडचा खेळाडू कुक’चा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असून त्याने सर्वाधिक म्हणजे ७७ धावा केल्या तर त्यामागोमाग मोईन अलीने अर्धशतक पूर्ण केलं. भारताकडून धडाकेबाज गोलंदाजी करताना इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने प्रत्येकी २-२ बळी टिपले आहेत. कूक आणि जेनिंग्स यांनी इंग्लंडला अर्धशतकी सलामी मिळवून दिली होती, परंतु त्यानंतर इंग्लंडचा डाव मात्र गडगडला आणि एकामागून एक धक्के बसण्यास सुरुवात झाली.

कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले त्यानंतर तो ७१ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार जो रूट आणि पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर तंबूत परतले. स्टोक्सने थोडा जम बसवला होता, पण तोदेखील अखेर पायचीत झाला. काही वेळाने १६७ चेंडूत अर्धशतकी चिवट खेळी करणारा मोईन अली बाद झाला. सॅम कुर्रानलाही शून्यावर बाद झाला. सध्या बटलर ११ तर रशीद ४ धावांवर खेळत आहेत. असं असलं तरी चौथा सामना जिंकून इंग्लंडने मालिका ३-१ने आधीच खिशात घातली आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x