3 December 2021 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला | तुमच्याकडे आहे? Cryptocurrency Prices Today | क्रिप्टो मार्केटमध्ये सुधारणा | जाणून घ्या आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती Stocks in Focus | 1 महिन्यात या 5 शेअर्समधून 13 ते 34 टक्क्यांपर्यंत रिटर्न | तुमच्या पोर्टफोलिओत आहेत? Stock Market LIVE | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्स 272 अंकांनी वाढला तर निफ्टी 17,473 च्या पुढे Stocks to Buy Today | आज हे ५ स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला | होल्डिंग टाईम १ आठवडा ATM Cash Withdrawal | ATM मधून पैसे काढणे महागणार | मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास इतके शुल्क आकारणार Multibagger Stocks | या शेअर्सने 2000 ते 7200 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला | तुमच्या पोर्टफोलिओत आहेत?
x

Facebook Couple Challenge | घरातील महिलांचे फोटो शेअर करणं टाळा | ठरू शकतं धोक्याचं

Facebook couple challenge, cyber cell, Security alert, Marathi News ABP Maza

मुंबई, २५ सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर हौशी लोकांनी बेस्ट फ्रेंड, बेस्ट साडी पिक्‍स चॅलेंज, बेस्ट कपल फोटो चॅलेंज अशा विविध टॅगलाइनखाली फोटो शेअर करून व्हॉट्‌सॲप, फेसबुकवर लाइक, कमेंटचा धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमध्ये करायचं काय, हा प्रश्‍न अनेकींना सतावत असल्याने अनेक महिलांनी अतिउत्साहाने सोशल मीडियावर फोटो अपलोड केले आहेत. मात्र, विविध लूकमधील हे फोटोच मॉर्फिंगसाठी (संगणकावर बदल) टार्गेट होत असल्याने सायबर चोरट्यांना संधी चालून आली आहे.

फेसबुक या समाजमाध्यमाने सध्या जोडप्यांना वेड लावले. अगदी सत्तर वर्षांच्या जोडप्यांपासून ते नवदाम्पत्यांनी फेसबुकवरील ‘कपल चॅलेन्ज’ स्वीकारले आहे. फेसबुकवरील ‘कपल चॅलेन्ज’ या ‘हॅश टॅग’खाली दाम्पत्य धडाधड छायाचित्र अपलोड करीत आहेत. छायाचित्र अपलोड करण्यापूर्वी थांबा, साधव रहा. तुमच्या प्रोफाइलवर सायबर गुन्हेगारांची पाळत आहे. तुम्ही अपलोड केलेले छायाचित्र धोकादायक व मानहानीकारक ठरू शकते. आर्थिक फटकाही तुम्हाला बसण्याची शक्यता अधिक आहे. फेसबुकवर छायाचित्र अपलोड करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.

मागील ३ दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेन्ज, फॅमिल चॅलेन्ज, सिंगल चॅलेन्ज, खाकी चॅलेन्ज, डॉटर चॅलेज आदी ‘हॅशटॅग’ वापरून छायाचित्र अपलोड करण्याची स्पर्धाच लागली आहे. अनेक जण पत्नीसोबतचे विविध ठिकाणी काढलेले छायाचित्र कपल चॅलेन्ज , फॅमिली चॅलेन्ज या हॅशटॅग खाली फेसबुकवर अपलोड करीत आहेत. मात्र वेळीच सावध न झाल्यास सायबर गुन्हेगार या छायाचित्रांना मॉर्फ करुन आपली बनावट प्रोफाइल तयार करुन त्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र अपलोड करु शकतात. त्याद्वारे आपल्याला ब्लॅकमेलही करु शकतात. वेळीच सवाध न झाल्यास आपल्याला हातात पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही.

फेसबुक या समाजमाध्यमावर कपल चॅलेन्ज नावाने सर्च केल्यास एकाच वेळी लाखो दाम्पत्याचे छायाचित्र दिसून येतात. अगदी सहज उपलब्ध होत असलेल्या या छायाचित्रांचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. छायाचित्र मॉर्फ एडिट करुन गुन्हेगार आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र तयार करतात त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडण्याची शक्यता आहे. नागपुरात समाजमाध्यमांवरील छायाचित्रांचा वाप करुन ब्लॅकमेल करण्याच्या सुमारे साडेतीनशे तक्रारी आल्या असून एकूण सायबर गुन्ह्यांची संख्या साडेतीन हजारांपेक्षा अधिक आहे.

समाजमाध्यमांवर छायाचित्र अपलोड करताना युझर्सने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. समाजमाध्यम हे टाइमपासचे साधन आहे. विविध ठिकाणचे छायाचित्र अपलोड करुन आपण सायबर गुन्हेगारांना नकळत आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती करुन देतो. छायाचित्राद्वारे गुन्हेगार आपली परिस्थिती ओळखून आपल्याला ब्लॅकमेल करु शकतो. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर छायाचित्र अपलोड करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिस खात्यातील सुरक्षा तज्ज्ञांनी देखील याबाबत नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर न करण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये असे नमूद केले होते की, ‘महिलांच्या फोटोंचे सायबर चोरटे गैरवापर करून मॉर्फिंग करीत आहेत. सर्व महिला व पुरुष घरात रिकामा वेळ असल्याने लॉकडाउन कालावधीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. नेमका याचाच गैरफायदा सायबर हॅकर्सनी घेतला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे टास्क तयार करून युजर्सला आकर्षित केले जात आहे. त्यापासून सावध राहा.’

‘‘प्रत्येकाने एकमेंकाना फोटो शेअर करायचे व ते व्हॉट्‌सॲप व फेसबुक स्टेटसला टाकायचे. ही फॅशन झाली आहे. त्यातून महिलांचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो शेअर केले जाऊ शकतात. त्यांची बदनामी करून ब्लॅकमेलिंग होऊ शकते. यासाठी वैयक्तिक अथवा कौटुंबिक कोणतेही फोटो शेअर करताना काळजी घ्या. प्रायव्हसी सेटिंग स्ट्रॉंग करा. गरज असेल तरच शेअर करते. लाइक व कमेंटला बळी पडू नका. त्यापेक्षा वैचारिक लिखाण करण्याचा प्रयत्न करा.’

 

News English Summary: The internet is always buzzing with activity each day. Each day, a new trend or challenge becomes popular on the internet. A new challenge has gone viral on the internet called ‘couple challenge’ where people who are dating post pictures of their partners together. From romantic poses or having a little bit of fun, pictures have been going viral on social media. Indeed, love makes the world go around. This challenge is a nice way to commemorate that love.

News English Title: Facebook couple challenge cyber cell alert Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#facebook(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x