14 December 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक | अनेक ठिकाणी जोरदार निदर्शनं

Farmers Protest, Bharat Band, New farm bill

चंदीगड, २६ मार्च: केंद्र सरकारच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता १२० दिवस पूर्ण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज (२६ मार्च) भारत बंदचं आवाहन केलं आहे.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. तसंच दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी दिली आहे. राजधनी दिल्ली, हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, एमएसपी व खरेदीवर कायदा बनवावा, शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्वप्रकारचे गुन्हे मागे घ्यावेत, वीज विधेयक, प्रदूषण विधेयक मागे घ्यावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती कमी कराव्यात अशा आजच्या भारत बंदच्या मागण्या आहेत.

 

News English Summary: Farmers have been protesting against the central government’s three new agricultural laws for the last few months. The agitation is being carried out on the borders of Delhi. This movement is now completing 120 days. Due to this, Samyukta Kisan Morcha of farmers has called for a strike in India today (March 26).

News English Title: Farmers called Bharat Band against New farm bill news updates.

हॅशटॅग्स

#BharatBand(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x