
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी बांधकाम कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 136.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 134.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 176.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )
25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 37.51 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 132.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीने स्टॉक एक्सचेंजला आपले बिझनेस अपडेट कळवले आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 23,500 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले होते. आथिर्क वर्ष 2023-24 मध्ये प्राप्त झालेल्या प्रमुख ऑर्डर्सबाबत एनबीसीसी इंडिया कंपनीने माहिती दिली की, त्यांना आम्रपाली येथे 10,000 कोटी रुपये मूल्याच्या अतिरिक्त फ्लोर एरिया रेशोचे काम मिळाले आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीने आपल्या बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये विशेषत: पुनर्विकास आणि जमीन विकास प्रयत्नांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
एनबीसीसी इंडिया कंपनीला केरळ राज्य गृहनिर्माण मंडळाकडून 2,000 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीच्या निव्वळ नफ्यात 60.2 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने 69.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 110.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने 13 टक्के वाढीसह 2,412.6 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 2135 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.