12 December 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Investment Tips | तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने बंपर परतावा मिळेल, फक्त या गोष्टीची काळजी घ्या

mutual fund, investment tips

Investment Tips | आजच्या काळात, एकीकडे शेअर मार्केट ने गुंतवणूकदारांना निराश केले आहे तर दुसरीकडे म्युच्युअल फंड वेगाने वाढत आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असते. पण तुम्ही गुंतवणुकीत काळजी घेतली तर तुम्हाला म्युच्युअल फंडातून चांगला परतावा मिळू शकतो.

म्युच्युअल फंड गुंतवणूक टिप्स :
शेअर बाजारावर आणि एक्विटी मार्केटवर जागतिक घडामोडींचा आणि युद्धाचा परिणाम झालेला दिसून येत आहे, तर दुसरीकडे म्युच्युअल फंड आणि त्यांच्या परताव्यात वेगाने वाढ होत आहे. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे असे साधन आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या सोयीनुसार गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला आपण SIP म्हणतो या द्वारे दरमहा गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होतो. म्हणजेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतानाही जोखीम असते. पण तुम्ही जर काही गोष्टींची काळजी घेतली तर म्युच्युअल फंडातून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

जोखीम क्षमतेची जाणीव :
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची उद्दिष्टे ठरवावी लागतील. तसेच, गुंतवणुकीपूर्वी जोखमीच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे खूप गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पुढील दहा वर्षांत ठराविक परतावा हवा असेल आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असेल, तर तुम्ही कोणतीही एक म्युच्युअल फंड योजना निवडू शकता जी तुम्हाला तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार उच्च परतावा मिळवून देईल. आणि पुढील 10 वर्षांनंतर तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करतील.

योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या :
जेव्हा तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करता तेव्हा सर्वप्रथम त्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या. फंड निवडल्यानंतर त्या योजनेची रेटिंग आणि इतर बाबीही तपासल्या पाहिजेत. तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करणार आहात त्या योजनेचा परतावा मागील काही वर्षांत किती होता ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती असावी. फंड पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या आहेत? परतावा किती ? यासह, तुम्हाला अंदाजे परतावा किती मिळेल? , कार्यकाळ किती? जोखीम किती? या साध्या बाबी समजून घ्याव्यात.

वैविध्यपूर्ण किंवा केंद्रित योजना :
एक गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण फंडांमध्ये करावी. तसेच, केंद्रित निधीतही तुमची थोडीफार गुंतवणूक असावी. अनेक फंडांचे पोर्टफोलिओ 50-60 कंपन्यांमध्ये पसरलेले असल्याने, काही म्युचुअल फंड योजना खूप मोठ्या प्रमाणत विस्तारलेल्या असतात. तर दुसरीकडे एक केंद्रित म्युचुअल फंड पोर्टफोलिओ मार्केट रॅलीमध्ये चांगला परतावा निर्माण करू शकतो. विविध फंड बाजारातील मंदीच्या काळात तुमच्या गुंतवणूकीचे संरक्षण करतात. अशाप्रकारे, तुम्ही बाजारातील कोणत्याही परिस्थिती मध्ये मग ती अपट्रेंड असो किंवा डाउनट्रेंड असो अशा दोन्ही स्थितींमध्ये नफा मिळवू शकता.

पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा :
म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणूक असल्याचे मानले जाते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त गुंतवणूक करत रहा आणि तुमच्या पोर्टफोलिओवर दुर्लक्ष करा. गुंतवणूकदार म्हणून तुम्ही वेळोवेळी योजना आणि पोर्टफोलिओची तपासणी केली पाहिजे. यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्धिष्टानुसार नपोर्टफोलिओचे व्यवस्थापन करणे तुम्हाला सोपे जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment Tips on mutual fund for long term benefits on 27 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x