3 May 2024 9:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Sarkari Naukri | 8 वर्षात मोदी सरकारने 7.22 लाख लोकांना दिली नोकरी, तर 2024 निवडणुकीपूर्वी 10 लाख नोकऱ्यांचं गाजर

Sarkari Naukri

Sarkari Naukri | मोदी सरकारच्या विविध विभागांनी गेल्या आठ वर्षांत देशभरात ७ लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली. या आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 22.05 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहितीही सरकारने दिली.

2021-22 या वर्षात 38,850 जणांची भरती :
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत ७ लाख २२ हजार ३११ जणांची भरती करण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. यापैकी 2021-22 या वर्षात 38,850 जणांची भरती करण्यात आली होती, तर या कालावधीत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 18.6 कोटींपेक्षा जास्त होती. यापूर्वी 2020-21 मध्ये 78,555 आणि 2019-20 मध्ये 1,47,096 लोकांची भरती करण्यात आली होती.

एकूण २२ कोटी ५ लाख ९९ हजार २३८ अर्ज आले होते :
या आठ वर्षांत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी एकूण २२ कोटी ५ लाख ९९ हजार २३८ अर्ज आले होते, अशी माहितीही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मोदी सरकार देशात रोजगार वाढवण्यावर खूप भर देत असल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला. त्यासाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याबरोबरच युवकांची पात्रता वाढविण्याचे काम केले जात आहे.

२०२४ पूर्वी सुमारे १० लाख लोकांना रोजगार देणार :
यापूर्वी जितेंद्र सिंह यांनी बुधवारी, २० जुलै २०२२ रोजी लोकसभेत लेखी उत्तर देताना केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये १ मार्च २०२२ पर्यंत ९ लाख ७९ हजार पदे रिक्त असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०२२ मध्ये म्हटले होते की त्यांचे सरकार २०२४ पूर्वी विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे १० लाख लोकांना रोजगार देईल.

आणखी एका लेखी उत्तरात म्हटलं :
जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या आणखी एका लेखी उत्तरात म्हटलं आहे की, केंद्र सरकारमध्ये भरतीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्यासाठी संबंधित मंत्रालये आणि विभाग जबाबदार आहेत. निवृत्ती, बढती, राजीनामा, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा कारणांमुळे सरकारी विभागातील पदे सातत्याने रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri Modi Government gave 7. 22 Lakh Naukri in 8 years from 22 Crore Applicants check details 17 July 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x