12 December 2024 4:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा

BSE Share Price

BSE Share Price | बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 3,247.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 या महिन्यात बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.3 टक्के मजबूत झाले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर 2 टक्के वाढले होते. ( बीएसई लिमिटेड कंपनी अंश )

जानेवारी 2024 मध्ये बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 3,171 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एप्रिल 2024 या महिन्यात बीएसई लिमिटेड स्टॉक 24 टक्के मजबूत झाला आहे. मागील 12 महिन्यांत बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स तब्बल 7 पट वाढले आहेत. मागील वर्षी या कंपनीचे शेअर्स 458 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील महिन्यात ब्रोकरेज फर्म इन्व्हेटेकने बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची रेटिंग बाय अशी अपग्रेड केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 2800 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

ULJK Financial Services फर्मने बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 3800 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत बीएसई लिमिटेड कंपनीने 108.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 51.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाही कालावधीत बीएसई लिमिटेड कंपनीने 431.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीने 245 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या महसूल संकलनात एकूण 76 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BSE Share Price NSE Live 25 April 2024.

हॅशटॅग्स

BSE Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x