20 May 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपमधील तेजस नेटवर्क शेअर्समध्ये वेळीच एंट्री घ्या, मजबूत कमाई करून देईल शेअर

Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.30 टक्के वाढीसह 939 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू झाली आणि शेअर 881 रुपये पर्यंत खाली आला होता.

नुकतंच तेजस नेटवर्क कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांची फायबर कनेक्ट या इटालियन भागीदारने इटलीमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी तेजस नेटवर्क कंपनीच्या दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांचा वापर केला आहे. बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 881.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, फायबर कनेक्ट कंपनीच्या FTTP म्हणजेच फायबर-टू-द-प्रिमाइस रोलआउटसाठी तेजस ऑप्टिकल नेटवर्किंग कंपनी ब्रॉडबँड ऍक्सेस उत्पादनांचा एकमेव पुरवठादार म्हणून काम करत आहे. फायबर कनेक्ट ही इटलीतील रिटेल टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून ओळखली जाते.

तेजस नेटवर्क्स कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “फायबर कनेक्ट कंपनीने आमची वाहक श्रेणी ऑप्टिकल आणि ब्रॉडबँड ऍक्सेस सेवा इटलीमध्ये वापरून संपूर्ण नेटवर्क निर्माण करण्याचा निर्णय घेतला, ही तेजस नेटवर्क कंपनीसाठी आनंदाची बाब आहे”.

तेजस नेटवर्क कंपनी डेटा नेटवर्किंग आणि नेटवर्क ऑप्टिकल बनवण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना इंटरनेट सेवा देखील प्रदान करते. सध्या तेजस नेटवर्क ही कंपनी 75 पेक्षा जास्त देशांमध्ये दूरसंचार सेवा प्रदान करण्याचे काम करत आहे.

नवीन शेअर होल्डिंग डेटानुसार परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी तेजस नेटवर्क कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवून आपला वाटा सप्टेंबरच्या तिमाहीत 11.11 टक्क्यांवर नेला आहे. मागील तिमाहीतील त्यांचा वाटा 10.9 टक्के होता. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत आपला वाटा 3.89 टक्क्यांवरून वाढवून 4.03 टक्क्यांवर नेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tejas Networks Share Price NSE 19 October 2023.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x