Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शनिवारी या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीचा PAT 78 टक्क्यांनी वाढून 140.35 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा PAT 78.83 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत या कंपनीने 11 टक्के वाढीसह 1,343.18 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1,205.06 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 31 मार्च 2024 पर्यंत 18,663 कोटी रुपये होता. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 4.35 टक्के वाढीसह 58.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
आयसीआयसीआय डायरेक्ट फर्म आणि हेम सिक्युरिटीज फर्मने पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 80 रुपयेपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या जर तुम्ही पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले तर तुम्हाला 1724 शेअर्स मिळतील. जर हा स्टॉक तज्ञांच्या सांगण्याप्रमाणे 80 रुपये किमतीवर गेला तर तुम्हाला 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 37 हजार रुपये नफा मिळू शकतो.
पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4840 कोटी रुपये आहे. या कंपनीतील 48.40 टक्के भागभांडवल किरकोळ गुंतवणूकदारांनी धारण केले आहे. तर प्रवर्तकांनी कंपनीचे 36.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Patel Engineering Share Price NSE Live 20 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा