4 May 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरवर परिणाम होणार? कंपनीच्या मोठ्या ग्राहक कंपनीचे दिवाळे निघाले

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी आयपीओची मुदत आता संपली आहे. आता गुंतवणुकदार स्टॉक वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IREDA कंपनीच्या IPO शेअर्सची लिस्टिंग झाल्यानंतर, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या टॉप 5 क्लायंटपैकी एक असलेल्या व्हिएतनाम स्थित ईव्ही निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या विनफास्ट कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत या विनफास्ट कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या महसुलात सर्वात जास्त योगदान देणाऱ्या कंपन्यांमध्ये विनफास्ट कंपनी, टाटा मोटर्स, आणि Jaguar Land Rover या कंपन्या सामील आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या एकूण महसुलाच्या 57 टक्के आणि सेवा क्षेत्रातील उत्पन्नाच्या 71 टक्के भांडवल उभारणी 5 अँकर गुंतवणूकदारांकडून केली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या कमाईचा मोठा भाग विनफास्ट कंपनीकडून येतो. ही कंपनी 2018 पासून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची मुख्य ग्राहक आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी नुकताच Nasdaq इंडेक्सवर सूचीबद्ध असलेल्या विनफास्ट कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन विक्रीमधील घसरण, घटणारी ग्राहक सख्या, आणि मूल्यमापन याबाबत नकारात्मक भावना व्यक्त केल्या होत्या. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या फाइलिंगनुसार सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत विनफास्ट कंपनीच्या विक्रीमधे घट झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात विनफास्ट कंपनीच्या व्यापारी क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

विनफास्ट कंपनी व्हिएतनाम देशाच्या सर्वात मोठ्या खाजगी व्यापारी कंपनीपैकी एक आहे. जागतिक बाजारपेठेत सूचीबद्ध होणारी विनफास्ट ही पहिली व्हिएतनामी कार कंपनी आहे. तसेच ही कंपनी Ev कार आणि स्कूटर यासारख्या वाहनाच्या उत्पादनात विस्तार करणारी पहिली कंपनी आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला विनफास्ट कंपनीचे शेअर बंपर वाढीसह सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO GMO Today 29 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x