29 April 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राज्यात संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं

NCP, Rupali Chakankar, Parambir Singh

मुंबई, २६ मार्च: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असताना राष्ट्रवादी मात्र अनिल देशमुखांच्या मागे खंबीरपणे उभी होती. आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर केली आहे.

नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. अस कसं चालेल? अशी टीका केली आहे. रुपाली चाकणकरांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. #ParambirExposed या हॅशटॅगखाली केलेल्या ट्वीटमध्ये रुपाली चाकणकरांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोगा मांडला आहे.

अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत 2003 साली परमबीरांनी 48.75 लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला तर 2007 साली नेरळमधील शगुफा सोसायटीत 3.60 कोटी रुपये किंमत असलेला एक फ्लॅट घेतल्याचा आरोपही रुपाली चाकणकरांनी केलाय. तसेच परमबीर सिंहांनी 2019 मध्ये हरियाणामध्ये 14 लाख रुपयांची जमीन खरेदी केली असून त्यांच्या हरियाणातल्या घराची किंमत चार कोटी रुपये असल्याची माहितीही रुपाली चाकणकरांनी दिलीय.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh had leveled serious allegations of corruption against state Home Minister Anil Deshmukh. After that the political atmosphere was well heated. Meanwhile, while the Bharatiya Janata Party was taking an aggressive stance, the NCP was firmly behind Anil Deshmukh. Now NCP’s women state president Rupali Chakankar has lashed out at former Mumbai Police Commissioner Parambir Singh.

News English Title: NCP Leader Rupali Chakankar criticised former Mumbai police commissioner Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x