1 October 2023 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस? Mufin Green Share Price | कमाल झाली! मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने एका दिवसात 9.99% परतावा दिला, लवकरच मल्टिबॅगर परतावा? Gujarat Alkalies Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत दिला 300% परतावा Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत हे शेअर्स 36 टक्के पर्यंत परतावा देतील Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 01 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया शेअरने तब्बल 3970 टक्के परतावा दिला, ऑर्डर्सबुक मजबूत, फायदा घ्या Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीला मिळाला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर्स तेजीच्या संकेताने खरेदी वाढली
x

50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला

Highlights:

  • 6 Saptrishi Statues Damaged in Mahakal Lok Corridor
  • कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधील कंपनी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हेन्टकरून उद्घाटन केलं होतं
  • कंत्राटदार नवीन पुतळे बसवणार
  • या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा कमलनाथ यांचा आरोप
  • ५० टक्के कमिशन – काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर लाचखोरीचा आरोप
Six Saptrishi statues

6 Saptrishi Statues Damaged in Mahakal Lok Corridor | मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात रविवारी जोरदार वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला. यामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे करोडो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या श्री महाकाल लोक कॉरिडॉरमधील सात सप्तर्षीं पैकी सहा भव्य पुतळ्यांचेही नुकसान झाले आहे. त्यानंतर भाजपवर प्रचंड टीका सुरु झाली आहे.

कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधील कंपनी
उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरातील ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉरमधील सहा सप्तर्षी मूर्तींचे रविवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळामुळे नुकसान झाले. महादेवांच्या मूर्ती पडल्या तेव्हा कॉरिडॉर भाविकांनी खचाखच भरला होता, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पुतळे आणि कॉरिडॉरच्या कामात गुजरातमधील कंपन्या गुंतल्याची कबुली त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हेन्टकरून उद्घाटन केलं होतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी ९०० मीटर लांबीच्या ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. एकूण ८५६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३५१ कोटी रुपये खर्चून ‘श्री महाकाल लोक’ तयार करण्यात आले आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनमध्ये महाकालेश्वराचे मंदिर आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.

कंत्राटदार नवीन पुतळे बसवणार
उज्जैनचे जिल्हाधिकारी कुमार पुरुषोत्तम यांनी सांगितले की, श्री महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये 160 मूर्ती आहेत, त्यापैकी सहा मूर्ती रविवारी दुपारी जोरदार वादळामुळे कोसळल्या. ही तुटलेली शिल्पे तेथे बसवलेल्या सात ऋषींपैकी एक असून सुमारे १० फूट उंच होती. पाच वर्षे प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारीही कंत्राटदारांवर असल्याने कंत्राटदार नवीन पुतळे बसवणार आहेत. आम्ही नियम आणखी कडक करत आहोत आणि त्यांची जबाबदारी निश्चित करणार आहोत.

या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा कमलनाथ यांचा आरोप
दरम्यान, मध्य प्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारने उज्जैनमध्ये भव्य महाकाल मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता, तेव्हा त्यानंतरचे (भाजपप्रणित) सरकार महाकाल लोकाच्या बांधकामात गंभीर अनियमितता करेल याची कल्पनाही केली नव्हती, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ट्विट केले आहे.

आज महाकाल लोककॉरिडॉरमध्ये वादळी वाऱ्यामुळे देवाच्या मूर्ती ज्या प्रकारे जमिनीवर कोसळल्या, ते दृश्य कोणत्याही धार्मिक व्यक्तीसाठी अत्यंत वेदनादायी दृश्य आहे. महाकाल लोकात पडलेले पुतळे तातडीने बसवावेत आणि ज्यांनी निकृष्ट दर्जाची बांधकामे केली आहेत, त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे.

५० टक्के कमिशन – काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर लाचखोरीचा आरोप
उज्जैन महाकुंभातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सामील असलेल्या भाजप सरकारच्या ५० टक्के कमिशनच्या पार्श्वभूमीवर महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये बसविण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे पुतळे पावसाळ्यापूर्वी वादळ आणि पावसात कोसळले असून महाकाल लोकच्या निम्म्याहून अधिक खुर्च्या तुटल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केली आहे. ट्विट केल्यानंतर यादव म्हणाले की, भाजप सरकार देवालाही सोडत नाही आणि आज महाकाल मंदिरातील विकासाला भ्रष्टाचाराचा वास येत आहे.

News Title: Six Saptrishi statues damaged in Kahakal Lok corridor after Thunderstorm in Ujjain check details on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x