27 July 2021 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

वाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून त्याला आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेसचे विरोधक म्हणजे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) सुद्धा पाठिंबा देणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष म्हणजे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) ने मोदी एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याला कारण होतं आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास मोदी सरकारने असमर्थता दर्शविली होती. त्याचाच राग मनात ठेऊन चंद्राबाबू नायडू एनडीए मधून बाहेर पडले आणि त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा ताबडतोब राजीनामे दिले होते.

परंतु आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्याने वाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून त्याला तेलगू देसम पार्टीने सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे.

दिवसेंदिवस एनडीए आणि मोदी सरकारच्या अडचणी वाढतानाच दिसत आहे आणि त्यातच कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूक जवळ आल्या असताना आंध्र प्रदेशातील या दोन प्रमुख पक्षांनी भाजप विरोधात उघडलेली ही आघाडी म्हणजे भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Chandra Babu Naidu(15)#YSR Congress(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x