27 June 2022 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

२०१९ मध्ये मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यास मोदी सरकारला मोठा धक्का

२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यास भाजपचा लोकसभेच्या ५० जागांवर पराभव होऊन त्यांना केवळ २३ जागांवरच विजय मिळविणे शक्य होणार आहे.

उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या फुलपुर आणि गोरखपूर पोटनिवडणुकीत सपा आणि बसपा एकत्र आल्याने दोन्ही जागी भाजपचा सुपडा साफ झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही मतदार संघ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे गड समजले जातात आणि तिथेच भाजपचा सुपडा साफ झाल्याने मोदीसरकार २०१९ मध्ये भलतेच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत.

जर २०१९ मध्ये मायावतींचा पक्ष बसपा आणि अखिलेश यादव यांचा सपा एकत्र लोकसभा निवडणुका लढल्यास संपूर्ण उत्तर प्रदेशातील ५० जागांवर भाजपचा दारुण पराभव होण्याची शक्यता आहे.

मोदीसरकारचा विजयरथ पूर्णपणे रोखायचा असेल तर उत्तर प्रदेश मोठी महत्वाची निभावणार आहे. त्यात जर सपा आणि बसपा एकत्र आल्यास मोदींच्या २०१९ मधील स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदीलाटेत एकूण ८० पैकी ७३ जागा खिशात घालून घवघवीत यश संपादन केलं होतं. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नवीन युती जन्माला आल्याने सर्व समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत. २०१७ मधील विधानसभेत भाजपला मिळालेली एकूण मत आणि बसपा-सपाला मिळालेली मत यांची आकडेवारी लक्षात घेऊन राजकीय विश्लेषकांनी ही शक्यता वर्तवली आहे. एकूणच उपलब्ध आकडेवारीचे चित्र पाहता नरेंद्र मोदींची २०१९ मधील वाट बिकट असल्याचे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x