17 November 2019 9:47 PM
अँप डाउनलोड

हे 'महागलं', जनता महागाईने कोलमडण्याची चिन्हं आहेत

मुंबई : नव्या आर्थिक वर्षात तुमचा खिसा लगेच हलका होण्याची शक्यता आहे आणि गृहिणींचा स्वयंपाकाचा रोजचा खर्च सुद्धा महागाईने कोलमडण्याची चिन्हं आहेत. काल एक एप्रिल पासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षात देशभरात अनेक गृहोपयोगी वस्तूंचे दर वाढणार आहेत.

कारण सुद्धा तसंच आहे म्हणजे काल एक एप्रिल पासून सर्वच प्रकारच्या उत्पन्नावर लागणाऱ्या प्राप्तिकरावर १ टक्का अतिरिक्त उपकर म्हणजे ‘सेस’ भरावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात मांडलेले अनेक नवीन कर प्रस्ताव रविवारी म्हणजे १ एप्रिल २०१८ पासून लागू झाल्या आहेत. त्या नवीन कर प्रस्तावावरील अंमलबजावणी सुरु झाली आहे, त्यात शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर, आरोग्य आणि शिक्षणावर ३ ऐवजी ४ टक्के ‘सेस’, तसेच ज्येष्ठ नागरिकांना ५० हजारापर्यंत व्याजावर आयकरावर सूट असे महत्वाचे बदल आहेत. २५० कोटी पर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांच्या कॉर्पोरेट करात बदल करून तो ३० टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आला आहे.

१ एप्रिल पासून होणारे बदल,

१. आरोग्य आणि शिक्षणावर ३ ऐवजी ४ टक्के ‘सेस’
२. शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर
३. ई – वे बिलप्रणाली प्रारंभ
४. २५० कोटी पर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांच्या कॉर्पोरेट करात बदल करून तो ३० टक्क्यांवरून २५ टक्के
५. ज्येष्ठ नागरिकांना ५० हजारापर्यंत व्याजावर आयकरावर सूट

काय महागणार,

१. टीव्ही – इलेक्ट्रॉनिक वस्तू
२. मोबाईल – मोबाईल अॅक्सेसरीज
३. टूथपेस्ट – टूथ पावडर
४. फ्रुट ज्युस – व्हेजिटेबल ज्युस
५. परफ्युम – कॉस्मेटिक्स – टॉयलेटरिज
६. सौंदर्यप्रसाधने
७. कार – टू व्हीलर अॅक्सेसरीज
८. ट्रक – बसचे टायर
९. चप्पल – बूट
१०. सिल्क कपडा
११. इमिटेशन ज्वेलरी- डायमंड
१२. फर्निचर
१३. घड्याळं
१४. एलसीडी – एलईडी टिव्ही
१५. दिवे
१६. खेळणी, व्हीडीओ गेम
१७. क्रीडा साहित्य
१८. मासेमारी जाळं
१९. मेणबत्त्या
२०. गॉगल
२१. खाद्यतेल
२२. टाईल्स – सिरॅमिकच्या वस्तू
२३. प्रत्येक बिल महागणार

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)#Narendra Modi(1038)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या