4 July 2020 1:49 AM
अँप डाउनलोड

भारत बंद, सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात एल्गार

मुंबई : दलित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. परंतु आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु या बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दलित संघटनांन मधील आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर तुफान दगडफेक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे. बिहार राज्यात बऱ्याच ठिकाणी रेल रोको करण्यात आल्याचे समजते. मुंबईमध्ये तरी अजून या बंदचा परिणाम झाला असल्याचे समजते.

गुजरातमधील राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या बंदची माहिती ट्विटरवरुन प्रसिद्ध केली आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करता येणार नाही. असा निर्णय येण्याचं मुख्य कारण म्हणजे मोदीसरकारने कोर्टात कमकुवत बाजू मंडळी आणि त्यातूनच हा निर्णय आल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

परंतु केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केले आहे की, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणते पाऊल उचलते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Bharat Band(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x