26 May 2022 10:19 PM
अँप डाउनलोड

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Whatsapp, Facebook, Instagram

मुंबई: भारतासह अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक ठिकाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं आहे. जवळपास ३० मिनिटांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प आहे. लाखो फेसबुक युजर्सचं अकाऊंट सुरू होत नाहीय, तर अनेकांना लाईक आणि कमेंट करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे ट्विटरवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

फेसबुक ठप्प झाल्यानं युजर्स हैराण झाले आहेत. याबद्दलची नाराजी अनेकांनी ट्विटरवर व्यक्त केली. फेसबुक युजर्सनी नोटिफिकेशनचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. सध्या फेसबुक डाऊन आहे. काही मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत होईल, असं नोटिफिकेशन फेसबुकवर लॉग इन करताच दिसू लागतो. याच नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अनेकांनी यावरुन फेसबुकची खिल्लीदेखील उडवली आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x