22 June 2024 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मुंबई : आज मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावर तोडगा याच मूळ चर्चेचा विषय असणार आहे असं वृत्त आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्व पक्षाच्या प्रतिनिधींची भूमिका समजून घेतली जाणार आहे. तसेच मराठा वर सर्वबाजुंचा विचार करून काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर विचारमंथन होणार आहे. वास्तविक मराठा आरक्षणावरून जेव्हा पुन्हा रान उठलं आणि आक्रमक आंदोलनामुळे काकासाहेब शिंदे या तरुणाचा हाकनाक बळी गेल्यावर आंदोलन अजूनच उग्र झालं आहे. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागताच सरकार खडबडून जाग झाल्याचं चित्र आहे.

त्यामुळे या आंदोलन अजून दाहक होण्यापूर्वीच ते थोपविण्यासाठी लवकरात लवकर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. आज विधान भवनात ही बैठक दुपारी २ वाजता आयोजित होणार असल्याचं वृत्त आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा यासाठीही हालचालींना वेग आला आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x