28 July 2021 6:12 PM
अँप डाउनलोड

मराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय? पुढे काय म्हणाले राज ठाकरे?

जालना : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य तसेच देशपातळीवरील अनेक विषयांना हात घालत त्यावर दिलखुलास उत्तर दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही वर्षांपूर्वी मराठा मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने राज्यभर भव्य मोर्चे काढले होते. त्यावेळी निवडणुकीची हवा असल्याने भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भली मोठी आश्वासनं दिली खरी, परंतु भाजप – शिवसेनेची सत्ता आल्यावर मात्र सरकारकडून काहीच सकारात्मक आणि ठोस उत्तर मिळत नसल्याने आदी शांत असलेला मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर पाहावयास मिळत आहे.

अनेक ठिकाणी मराठा समाजाने आक्रमक पवित्र घेत चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन करून सरकारला इशारा देण्याचे प्रयत्नं सुरु केले आहेत. त्यात अनेक ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस फोडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परंतु मराठा समाजाचा या आक्रमक पवित्र अजून जरी प्राथमिक स्वरूपात दिसत असला तरी तो अधिक हिंसक आणि ऊग्र रूपात प्रकटल्यास भाजप – शिवसेना सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

एकूणच राज्यातील ही परिस्थिती पाहता पत्रकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणविषयी तसेच सरकारच्या भूमिके विषयी प्रश्न केला असता राज ठाकरे म्हणाले की,’ निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आश्वासन देण्याच्या बाता मारणार सरकार या विषयावर केवळ वेळकाढू पणा करत आहे आणि मराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय?’, असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या वेळकाढू भूमिकेवर आणि हेतूवर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(670)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x