20 May 2022 9:29 AM
अँप डाउनलोड

शेणगावच्या जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

पंढरपूर : शेणगावच्या अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपुरात सकाळी साडेतीनच्या सुमारास ही विठूरायाची ही शासकीय पूजा पार पडली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली आहे.

जाधव दाम्पत्या सोबत या पूजेला शासनाच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर आणि खासदार अनिल देसाई यांची उपस्थिती होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा अशी जाधव दाम्पत्याने विठुरायाकडे मागणी केल्याचे सांगितलं.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण पंढरपूर विठुरायाच्या नामात आणि विविध रोषणाईत नाहून निघाल्याचे चित्र जागोजागी पाहावयास मिळत होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सपत्नीक विठूरायाची पूजा केली.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(688)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x