21 October 2019 4:15 PM
अँप डाउनलोड

कै. रमेश वांजळेनंतर आता प. महाराष्ट्रात मनसेकडून पैलवान मंगलदास बांदल शिरूर लोकसभेसाठी इच्छुक?

जुन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष विस्ताराच्या निमित्त राज्याच्या दौऱ्यावर होते. काल त्यांच्या हस्ते मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी उभारलेल्या भव्य ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचे लोकार्पण करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य संचारल्याचे चित्र त्यांच्या राजकीय दौऱ्यातून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज ठाकरे येणार असल्याने स्थानिकांची तुफान गर्दी झाली होती. सध्या मनसेसाठी पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पोषक असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा काही धाडसी निर्णय घेऊन विरोधकांना धोबीपछाड करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धोबीपछाड करणारा पैलवान रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे आणि तसे अप्रत्यक्ष संकेत काल राज ठाकरे यांनी जुन्नर मध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांच्या उपस्थित दिले आहेत.

मनसेकडून लोकसभेसाठी पैलवान मंगलदास बांदल यांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसू लागले आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तीन वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत. परंतु आगामी निवडणुकीत त्यांचा विजय खडतर असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटते.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी म्हटलं होत की, ‘राजकारणात टिकणे अतिशय अवघड आहे असे सांगत भविष्यात मी कुठेही विधानसभेत दंड थोपटणार असा दावाही त्यांनी केला होता. राजकारणात निष्ठेला काहि महत्व राहिले नाही. निष्ठा काय तर ते निसटतच जातयं, असंही प्रवचन ठोकायला त्यांनी कमी केलं नाही. इतकंच नाही तर पुढे थेट मंचावरून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उद्धेशून म्हटलं होत की, ‘ थोडा आधार दिला असता तर मी निवडून आलो असतो आणि आमदार झालो असतो’. त्यामुळे मंगलदास यांनी आढळराव पाटलांविरुद्ध रणशिंग तर फुंकलं नाही ना अशी कुजबुज सुरु झाली होती. अनेक पक्षांत राहिलेल्या बांदल यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया त्यावेळी उंचावल्या होत्या.

त्यावेळी आढळराव पाटलांनी थोडी सारवासारव करत, लोकांच्या आशिर्वादाने मी निवडून आलो. खासदार म्हणून मी निवडून आल्यावर फक्त सर्वसामान्यांसाठी काम करावयाचे ठरविले आहे. पहिलवान बांदल तुम्ही मला मदत केली आहे आणि ते माझ्या लक्षात आहे. पुढच्या निवडणुकीत तुमच्या पाठीशी उभा राहिन,` असं सांगत आढळरावांनी वेळ मारून नेली होती.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल राजकीय फटकेबाजी करण्यात सुद्धा तरबेज आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जर त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास आणि संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ प्रचार सभांनी ढवळून काढल्यास, आगामी निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता आहे. राज ठाकरे सुद्धा विरोधकांच तोंड बंद करण्यासाठी चाणाक्ष राजकारणाच्या भूमिकेत दिसत असून, त्यांनी विधानसभे सोबत लोकसभा सुद्धा गांभीर्याने घेतल्याचे निदर्शनास येते आहे. राज ठाकरे हीच रणनीती अनेक लोकसभा मतदारसंघात राबवू शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(451)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या