19 January 2025 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

मनसे आमदार शरद सोनावणेंच्या संकल्पनेतील भव्य कुस्ती आखाड्याचे राज ठाकरेंच्या हस्ते उदघाटन

जुन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्ष विस्ताराच्या निमित्त राज्याच्या दौऱ्यावर असून, आज त्यांच्या हस्ते मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी उभारलेल्या भव्य ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचे लोकार्पण करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य संचारल्याचे चित्र त्यांच्या राजकीय दौऱ्यातून पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद, बीड आणि धुळे शहरांचा पक्ष विस्ताराचा दौरा पूर्ण करून, आज राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे जुन्नर येथे उपस्थिती लावून मनसेचे आमदार शरद सोनावणे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या भव्य ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचे राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने जुन्नर येथील ओतूर या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमला होता.

दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे विनोदाने म्हणाले की, ‘मी कुस्ती लावायला आलो आहे, लढायला नाही. तेव्हा जरा सबुरीने घ्या’. नाहीतर सगळे मलाच रिंगणात घ्याल आणि लंगोटीवर घरी पाठवाल. मग बायकोने लंगोटीवर बघितलं तर म्हणेल हे कोण आलंय? असं म्हणताच संपूर्ण आखाड्यात एकच हशा पिकली आणि सर्व माहोल उत्साही झाला आणि कार्यक्रम मोठ्या जोमाने पार पडला.

मनसेने सध्या पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात मनसेचा दबदबा वाढताना दिसत असून त्याचे चांगले परिणाम पक्षाला आगामी निवडणुकीत दिसू शकतात, असं स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यामुळे जसजसे राज ठाकरे राज्यभर दौरे करून वातावरण ढवळून काढतील, तसतशी पक्षासाठी होकारात्मक वातावरण निर्मिती होताना दिसेल, अस राजकीय विश्लेषकांच मत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x