Shinde Camp in Tension | शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने ठाकरेंना बळ

Shinde Camp in Tension | शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधान सभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे माध्यमांचं लक्ष लागलंय. त्यालाच अनुसरून आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान सभा सचिवांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचं निवेदन ते सचिवांना देण्याची शक्यता आहे.
विधानसभा सचिवांची भेट घेणार
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आज विधानसभा सचिवांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्ययालयानं राज्याच्या संत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अनिल परब हे आज सचिवांची भेट घेणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे पालन करून आपत्र आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी परब सचिवांना निवेदन देण्याची शक्यता आहे.
निवडणुकीपूर्वी शिंदे गट अडचणीत :
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होण्याची आणि मविआमध्ये फूट पडण्याची संधी शोधली जात आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह जाणार?
मीडिया वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं मुंबई महापालिका निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे, असं म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने निकालपत्रात तत्कालीन राज्यपालांवर उडलेले ताशेरे, आमदार भरत गोगावले व्हीप म्हणून आणि एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवणं यामुळे जनमतावर झालेला परिणाम या मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजप देखील सावध भूमिका घेत आहे. विशेष म्हणजे निकालपत्रात शिवसेना पक्षाबाबतही काही लिखित मुद्दे निकालपत्रात दिल्याने काही कायदेतज्ज्ञांनी तर शिंदे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह जाण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shinde Camp in Tension MLA Anil Parab will meet the assembly secretary today check details on 15 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा
-
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल
-
Killpest Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 8 वर्षांत किल्पेस्ट शेअरने गुंतवणुकदारांना 1 लाखावर दिला 1 कोटी रुपये परतावा
-
जनता महागाई-बेरोजगारी मुद्द्यांवर मतदान करणार की पुन्हा धार्मिक ट्रॅपमध्ये? लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उद्घाटनाची योजना सज्ज
-
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
-
Bank Account Alert | बँक अकाउंट अलर्ट! महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने परवाना रद्द केला, ग्राहकांच्या पैशाचं काय?
-
Jonjua Overseas Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा, जोनजुआ ओव्हरसीज शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या
-
Quick Money Shares | हे टॉप 5 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, गुंतवणुकीसाठी लिस्ट सेव्ह करून ठेवा, फायदा होईल
-
2014 मध्ये 15 लाख देण्याचं आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन देणारे मोदी सभेत म्हणाले, 'आश्वासन देऊन विसरणं ही काँग्रेसची सवय'
-
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय