10 November 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
x

रोहिणी खडसेंनी घेतली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट | नेमकं काय कारण?...

Eknath Khadse

मुक्ताईनगर, १२ ऑगस्ट | माजी महसूलमंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

यावर पाटील यांनी पुढील आठवड्यात उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, पं.स. सदस्य दिपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.

दरम्यान, संत मुक्ताई साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाबाबत ईडीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. आधीच भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना, त्यांची कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ही माहिती मागविण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rohini Khadse meet NCP state president Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x