13 July 2020 2:33 PM
अँप डाउनलोड

खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के परिचारिकांचे राजीनामे; सरकारच्या अडचणीत वाढ

nurses, private hospitals, leaving jobs, Covid 19

पुणे, २७ मे : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी २०९१ नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात सर्वाधिक ९७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या १७९२ वर पोहोचली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. मुंबईत काल दिवसभरात १००२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ इतकी झाली आहे.

दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयातील परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढतच आहे. खासगी रुग्णालयांसाठीदेखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांमधून ५० टक्के परिचारिका काम सोडून मूळगावी परतल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली असून परिचारिकांच्या संघटनांबरोबर चर्चा करून काम न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या खासगी रुग्णालयांमध्ये १०० पेक्षा जास्त खाटा आहेत, त्या रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा शासकीय नियंत्रणाखाली घेण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खासगी रुग्णालय प्रशासनासोबत बैठकही घेतली होती. त्यामध्ये रुग्णालयांनी परिचारिका काम सोडून जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची कमतरता अशा कारणांमुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधून ५० टक्के परिचारिकांनी काम सोडून त्या मूळगावी परतल्या आहेत किंवा परतत आहेत. त्यांनी काम सोडून जाऊ नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये परिचारिकांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई कीट) पुरवली जातील. रुग्णालयांमधील बहुतांश परिचारिका केरळ राज्यातील असल्याने यासंदर्भात परिचारिकांच्या मल्याळी संघटनांसोबत बोलणी सुरू आहेत. तसेच मध्यपूर्व देशांमधून अनेक भारतीय परिचारिका केरळमध्ये परतत आहेत. या परिचारिकांना वैद्यकीय सेवेसाठी पुण्यात आणण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत.

 

News English Summary: Nurses at several hospitals in the state have contracted the corona. This has created an atmosphere of fear among the nurses. The incidence of corona is increasing day by day. The Essential Services Act (MESMA) has also been implemented for private hospitals. Against this backdrop, the shocking fact that nurses in private hospitals are leaving their jobs has come to the fore. About 50 per cent nurses from private hospitals in the state, including Mumbai, have left their jobs and returned home.

News English Title: Shocking fact that nurses in private hospitals are leaving their jobs Covid 19 News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1011)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x