11 December 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News
x

PM केअर्स फंडाला २१ कोटीचं दान देणाऱ्या कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

India Bulls, Sacked Employees, PM Care Fund

नवी दिल्ली, २७ मे: इंडिया बुल्स ही भारतातील विख्यात कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंडाला २१ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. त्यानंतर या कंपनीने त्यांच्या २,००० कर्मचाऱ्यांना व्हॉट्सऍप कॉलद्वारे कामावरून काढून टाकले आहे, असा आरोप कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाच्या प्रमुख असलेल्या श्रीवत्सा यांनी केला आहे. श्रीवत्सा यांनी इंडिया बुल्सद्वारे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा हा व्हाट्सऍप कॉलचा व्हिडिओसुद्धा जगजाहीर केला आहे.

कर्नाटकातील काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी आरोप केला आहे की, इंडिया बुल्स कंपनी भाजपाला २०१४ पासून देणग्या देत आहे. आतापर्यंत इंडिया बुल्सने भाजपाला शेकडो कोटी रुपये दिले आहेत. नुकतेच इंडिया बुल्सने मोदींच्या पीएम केअर्स फंडाला २१ कोटी रुपये देणगी दिली आहे. काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी इंडिया बुल्स कंपनीच्या एका अधिकाऱ्याचा व्हाट्सऍप कॉलचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात हा अधिकारी एका कर्मचाऱ्याला सांगतो की, आता तुम्हा सर्व कामगारांचा ३१ मे हा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही त्या अगोदरच आपला राजीनामा दिलात तर तुम्हाला इंडिया बुल्स कंपनीद्वारे मे महिन्याचा पगार दिला जाईल. तसेच एक्सपिरीयन्स लेटर्सही दिली जातील आणि जर तुम्ही राजीनामे दिले नाही तर तुम्हा सर्वांना कंपनी कामावरून काढून टाकू शकते.

एकीकडे कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू आहे. अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र इंडिया बुल्स कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे, हे या कंपनीने पीएम केअर्स फंडाला २१ कोटी रुपये देणगी दिल्याने दिसून आले आहे. इंडिया बुल्स कंपनीमध्ये 26 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी २ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की, कंपनीने आम्हाला 3 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय कामावरून काढून टाकले आहे.

 

News English Summary: India Bulls is a well known company in India. The company has recently donated Rs 21 crore to Prime Minister Narendra Modi’s PM Care Fund. The company has since sacked 2,000 of its employees through WhatsApp calls, alleged Shrivatsa, the Congress party’s social media chief in Karnataka.

News English Title: India Bulls company has sacked 2000 of its employees through WhatsApp calls News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x