20 May 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Phantom Digital Share Price | कमाल झाली! फँटम डिजिटल इफेक्ट्स शेअरमध्ये बंपर तेजी, 1 महिन्यात 37% परतावा, खरेदी करावा का?

Phantom Digital Share Price

Phantom Digital Share Price | मागील काही महिन्यापासून फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीच्या शेअरने तुफान तेजी पकडली आहे. हा स्टॉक सुसाट वेगात गुंतवणूकदारांचे पैसे वाढवतो. मागील आठवड्यात शुक्रवारी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 455.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 478.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीबद्दल माहिती

फँटम डिजिटल इफेक्ट्स ही कंपनी मुख्यतः बॉलिवूड सिनेमामध्ये VFX संबंधित काम करते. फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीने प्रसिद्ध बाहुबली-I, बाहुबली-II, ऑस्कर पुरस्कार प्राप्त RRR, यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये व्हीएफएक्सचे काम केले होते.

फँटम डिजिटल इफेक्ट्स हा कंपनीचे मुख्यालय भारतात आहे, कंपनीची कार्यालये अमेरिका आणि कॅनडामध्येही सुरू करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांत भारतात चित्रपटात VFX चे काम आणि त्याची बाजारपेठ जबरदस्त वाढली आहे. 2022 पर्यंत भारतात VFX व्यवसायाचा एकूण आकार 107 अब्ज डॉलर्स होता.

2023 या वर्षात फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 1 महिन्यापूर्वी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 37.55 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

या कंपनीचा IPO ऑक्टोबर 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीच्या शेअरची प्राइस बँड 91 ते 95 रुपये निश्चित करण्यात आली होती. ज्या गुंतवणूकदारांनी फँटम डिजिटल इफेक्ट्स आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5 पट वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Phantom Digital Share Price today on 03 July 2023.

हॅशटॅग्स

Phantom Digital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x