14 December 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मुख्यमंत्र्यांनी बोलावली महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची तातडीची बैठक

Chief Minister Uddhav Thackeray, Mahavikas Aghadi

मुंबई, २७ मे : राज्यात कोरोना विषाणू रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः मुंबई, पुणे शहरांमध्ये रेड झोन भागांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या रेड झोन एरियामध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर खबरदारीच्या दृष्टिकोनातून नवीन नियमावली कोणत्या स्वरूपात करता येईल, तसेच सध्याच्या नियमात कोणते बदल करून काही भागांमध्ये रिलॅक्सेशन देता येईल, या उद्देशानं महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीमधील मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत.

मंगळवारी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार स्थिर आहे असा दावा शिवसेना नेते करत असले तरी सरकारमध्ये बिघाडी असल्याचं राज्यातील घडामोडींवरुन दिसते. शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत २ तास चर्चा केली. महाराष्ट्र सरकारवर अस्थिरतेचे सावट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडीतील मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता तसेच आरोग्य नगर विकास ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण या विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सकाळी ११ च्यादरम्यान ही बैठक सुरू होणार असून बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होती, असं सांगितलं जात आहे.

 

News English Summary: An important meeting of the ministers in the Mahavikas Aghadi government will be held on Wednesday to discuss the changes in the existing rules to allow relaxation in some areas. Ministers and secretaries of Mahavikas Aghadi will be present at the meeting.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray called an emergency meeting of allies of Mahavikas Aghadi News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x