10 June 2023 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

KDMC'नंतर मनसेच्या अजून एका विधानसभेतील उमेदवारांचा पक्षाला रामराम

Former MLA Krishna Hegde, MNS Juili Shende, joined shivsena

मुंबई, ०६ फेब्रुवारी: कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश कदम हे पदाधिकारी असताना देखील त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश देऊन राजेश कदम यांचं कल्याण डोंबिवलीत राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

त्यानंतर शिवसेनेने पुन्हा मुंबईतील विले पार्ल्यात भाजप आणि मनसेला डबल धक्का दिला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत माजी आमदार कृष्णा हेगडे आणि २०१९च्या विले पार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनी शिव बंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या तोंडावर मनसे आणि भाजपाला धक्के बसणं सुरूच आहे.

त्यामुळे विले पार्ले विधानसभा मतदार संघात शिवसेनेचं पारडं जड झालं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि मनसे येथील राजकीय पोकळी कशी भरून काढणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: Shiv Sena’s double blow to BJP and MNS in Vile Parle. In the presence of Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Saheb Thackeray, former MLA Krishna Hegde and MNS candidate for 2019 Vile Parle Assembly Juili Shende entered the Shiv Sena party wearing Shiv Bandhan.

News English Title: Former MLA Krishna Hegde and MNS candidate for 2019 Vile Parle Assembly Juili Shende joined shivsena news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x