बापरे! त्यांचा ५ लांब पल्ल्यांच्या ट्रेनने प्रवास: पोलीस व रेल्वे प्रशासन सगळ्यांच्या डोक्याला ताप
मुंबई, ०१ एप्रिल: निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.
दिल्लीतील निझामुद्दीन तबलिगी मर्कझ येथील धार्मिक कार्यक्रमात पुण्यातील १३० हून अधिक लोक उपस्थित होते, आतापर्यंत यातल्या ६० लोकांना शोधून विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या १३० पुण्यातील लोकांचा शोध घेतला जात आहे त्यातले अनेक लोक हे सध्या पुण्यात नाही किंवा त्यांचा शोध लागत नाही अशीही माहिती त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी देखील या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस दिली होती तरी त्यांनी मोठ्याप्रमाणावर लोकांना जमवलं होतं हे देखील व्हिडिओत उघड झालं आहे.
मात्र त्यानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निझामुद्दीनच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांनी ५ लांब पल्ल्यांच्या ट्रेनने प्रवास केला आहे. आता भारतीय रेल्वेने या पाच एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. करोनाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रेल्वेने उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
तबलीघी जमात मरकझमधील लोकांनी प्रवास केलेल्या या ५ गाड्या १३ मार्च ते १९ मार्च या कालावधीत रवाना झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये आंध्र प्रदेशात जाणारी दुरंतो एक्स्प्रेस, चेन्नईपर्यंत जाणारी ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेस, नवी दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेस आणि एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
News English Summary: Thousands of people have participated in the Nizamuddin’s Merkaz journey by 5 long stretches of trains. Now Indian Railways has started the task of finding passengers in these five express trains. The steps taken by the railways are considered to be very important in preventing the increasing spread of corona. These 5 trains traveling by the people of Merkaz from the Tablighi tribe depart from March 13 to March 19. These trains include Duronto Express, which runs to Andhra Pradesh, the Grand Trunk Express to Chennai and the Tamil Nadu Express, New Delhi-Ranchi Rajdhani Express and the AP Sankranti Kranti Express.
News English Title: Story Corona Virus in India passengers of 5 trains under watch after Tablighi Jamaat moved from them News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News