प्रवासी विमानांना भारतात प्रवेश बंदी; तर देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी महत्वाची सूचना
नवी दिल्ली, १९ मार्च : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. २२ मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
याशिवाय केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी काही निर्बंध घालण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेत रुग्ण आणि विद्यार्थ्यांशिवाय इतर कुणालाही सवलतीच्या दरात प्रवास करू दिला जाणार नाही. शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे आणि बसप्रवास टाळावा यासाठी हा नियम बदलण्यात आला आहे. वयाच्या ६५ वर्षांवरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी अत्यंत गरजेचं असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असं सांगण्यात आलं आहे.
प्रवासी विमानांना भारतात प्रवेश बंदी; तर देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी महत्वाची सूचना#CoronaCrisis pic.twitter.com/iH59Q3yhow
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 19, 2020
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचं वय ६० हून अधिक आहे. त्यामुळेच ६५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, असे आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनीदेखील घरीच राहावं, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. लहान मुलांची आणि ज्येष्ठांची रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. रेल्वे आणि विमान प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सर्व सवलती रद् करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांना यामधून वगळण्यात आलंय.
Govt of India: Railways and civil aviation shall suspend all concessional travel except for students, patients and divyang category
— ANI (@ANI) March 19, 2020
परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे भारतात करोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. करोना व्हायरसचे सध्या देशभरात १५० पेक्षा जास्त रुग्ण असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
News English Summery: The Government of India has taken a tough decision to stop the spread of Coronavirus. There will be no passenger flight in India for the next one week from March 22, the correspondence office has said. In addition, the Central Government has directed the states to impose some additional restrictions. No one will be allowed to travel at discounted rates except the patients and students on the train. This rule has been changed so that senior citizens can avoid rail and bus travel. Citizens over the age of 65 and children under the age of 10 should not leave the house unless absolutely necessary.
News English Title: Story India blocked arrival of all international flights PM Narendra Modi address the nation after Corona Virus Crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News