7 May 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कृषी कायद्याची पोलखोल | शेतकऱ्यांशी करार करून २ कोटींचा चुना | कंपनी पसार

Madhya Pradesh, farmer cheated, Registration farm law

भोपाळ, ३० डिसेंबर: केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.

विरोधकांनी देखील सरकारवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दात निशाणा साधला होता. अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत अशा शब्दांत वकील प्रशांत भूषण यांनी टीकास्त्र सोडलं होतं.

केंद्रातील मोदी सरकारकडून संसदेत विरोधकांचा विरोध डावलत योग्य चर्चेशिवाय लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एका प्रकार मध्य प्रदेशात समोर आलाय. कारण शेतकऱ्यांची तब्बल २ कोटींची फसवणूक करून ट्रेडर्स फरार झाल्यानं खळबळ माजली आहे. त्यामुळे मोदी सरकारने लागू केलेल्या नव्या शेती कायद्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. (Madhya Pradesh farmer duped in Dewas Harda registration farm law over question)

भाजपाची सत्ता असलेल्या असलेल्या मध्य प्रदेशातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं तब्बल २ डझन शेतकऱ्यांसोबत पिकांसाठी करार केला होता. मात्र, वेळ आली तेव्हा संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता ही कंपनीने गाशा गुंडाळून पळ काढला आहे. दोन डझन स्थानिक शेतकऱ्यांनी मसूर-चनाच्या पिकांसाठी जवळपास २ कोटी रुपयांचा करार केला होता.

‘खोजा ट्रेडर्स’चे मालक असलेल्या दोन भावांनी शेतकऱ्यांकडून उत्पादन घेतलं मात्र कंपनीकडून देण्यात आलेले चेक बाऊन्स झाले. हरदाच्या देवास गावातील २२ शेतकऱ्यांना ‘खोजा ट्रेडर्स’सोबत करार केला होता. मात्र, ट्रेडर्स अचानक गायब झाला. शेतकऱ्यांनी माहिती काढली तेव्हा समोर आलं की, केवळ ३ महिन्यांतच कंपनीनं रजिस्ट्रेश संपुष्टात आणल होतं. संबंधित प्रकरणाची खातेगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलीय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना लिखित स्वरुपात तक्रार देण्यात आली आहे.

ट्रेडर्सकडून देण्यात आलेले चेक बाऊन्स झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजूबाजूच्या गावांतील जवळपास १००-१५० शेतकऱ्यांसोबत ही फसवणूक झाली आहे. खोजा ट्रेडर्सकडून बाजार समितीपेक्षा ७०० रुपये अधिक दर देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. चेक बाऊन्स झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क केला. तेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशनचं नसल्याचं समोर आलं.

 

News English Summary: In Madhya Pradesh, there is a question mark over the implementation of agricultural laws by the Modi government at the Center, which has been implemented without proper discussion. A new problem has arisen in front of the farmers who have been cheated after the traders absconded by imposing lime worth Rs 2 crore on the farmers. A company in Madhya Pradesh’s Harda district had signed crop agreements with about two dozen farmers. But when the time came, the company disappeared without paying the farmers. Two dozen farmers had signed an agreement worth about Rs 2 crore for lentil and gram crops.

News English Title: Madhya Pradesh farmer duped in Dewas Harda registration farm law over question News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x