15 December 2024 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

अदानी, अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत - प्रशांत भूषण

Senior lawyer Prashant Bhushan, Modi Government, new farm laws

नवी दिल्ली, १६ डिसेंबर: काल शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्ष देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे. आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला होता.

दरम्यान, विरोधकांनी देखील सरकारवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. याच दरम्यान ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत अशा शब्दांत वकील प्रशांत भूषण यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत. आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची? असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. Senior lawyer Prashant Bhushan criticized Modi Government over new farm laws.

दुसरीकडे राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, कोरोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

News English Summary: Senior lawyer Prashant Bhushan has also slammed the Bharatiya Janata Party and Prime Minister Narendra Modi. “People living on Adani and Ambani’s pieces are calling farmers gangs,” said lawyer Prashant Bhushan. Prashant Bhushan tweeted about this from his Twitter account. “People living on Adani and Ambani’s pieces are now calling their farmers piecemeal gangs. Now we have to admit that Modi is a watchman. The only question is who does the watchdog. Adani-Ambani or the farmers?” That’s what he said in a tweet.

News English Title: Senior lawyer Prashant Bhushan criticized Modi Government over new farm laws news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x