15 December 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

भाजप देशातील तुकडे-तुकडे गँग | हिंदूं-मुस्लिम वाद भडकवले | आता शिखांची बदनामी

SAD Chief Sukhbir Singh Badal, BJP party, Real Tukde Tukde gang

नवी दिल्ली, १५ डिसेंबर: देशातील सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. या साऱ्या प्रकरणात कुस्तीपटू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या बबिता फोगाट हिने उडी घेतली.

बबिता फोगाट हिने ऑगस्ट २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ती विविध राजकीय मुद्द्यांवर सातत्याने मतप्रदर्शन करताना दिसली आहे. बबिता फोगाटने हे आंदोलन तुकडे-तुकडे गँगने हायजॅक केल्याचे वादग्रस्त ट्विट केलं. “आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे ट्विट तिने केले.

दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे.आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला.

 

News English Summary: Shiromani Akali Dal chief Sukhbir Singh Badal has strongly attacked the Bharatiya Janata Party. Sukhbir Singh Badal has accused the Bharatiya Janata Party (BJP) of being a real gang in the country and breaking up the country during the farmers’ agitation. The Bharatiya Janata Party has shattered national unity, shamelessly incited Hindus against Muslims. Now it is doing so against its Sikh brethren. BJP is pushing patriotic Punjab into ethnic fire, said Sukhbir Singh Badal, targeting the Bharatiya Janata Party.

News English Title: Shiromani Akali Dal Chief Sukhbir Singh Badal said BJP party is real Tukde Tukde gang of country news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x