27 July 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

४०% मालवाहतुक प्रभावित | ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित | ट्रेडर्सचा केंद्रावर संताप

Trade associations, Modi government, Farmers Protest, New Farm Laws

नवी दिल्ली, १६ डिसेंबर: राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस… परंतु, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, करोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दिल्लीकडे येणाऱ्या मालवाहतुकीपैकी जवळपास ४० टक्के वाहतूक शेतकरी आंदोलनामुळे प्रभावित झाली आहे. दिल्ली आणि एनसीआर व्यापारावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडला असून, गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली. Trade associations not happy with Modi government for not solving farmers issues over new farm laws news updates.

शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी त्यामुळे केंद्र सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढावा, तसेच सरकारने खुल्या मनाने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे. आंदोलन पुढेही असेच सुरू राहिले तर, व्यापारी, मालवाहतूकदार तसेच इतर वर्गांना व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागेल. कोरोनामुळे आधीच व्यापार प्रभावित झाला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दिवाळीनंतर व्यापार हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती; परंतु शेतकरी आंदोलनामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकरी आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम)कडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे साखर कारखान्यांनी 2019-20च्या हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) निर्धारित 6 मिलियन टनाच्या अनिवार्य कोट्याच्या तुलनेत 5.7 मिलियन टन साखरेची निर्यात केली होती. सरकार साखरेच्या निर्यात सबसिडीच्या विस्तारावर पुनर्विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला स्वीटनर विकण्याची चांगली संधी असल्याने हा विचार केला जात असल्याचं गेल्या महिन्यात अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.आजच्या बैठकीत साखरेच्या निर्यातीवर 3600 कोटींची सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना ऊर्वरीत रक्कम देण्याचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

News English Summary: About 40 per cent of the freight traffic to Delhi has been affected by the farmers’ agitation. According to the Confederation of All India Traders (CAT), trade between Delhi and the NCR has been adversely affected by Rs 5,000 crore in the last 20 days.

News English Title: Trade associations not happy with Modi government for not solving farmers issues over new farm laws news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x